Home Cities धरणगाव धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

26902c84 5bbf 46c7 83e6 e0041829f05d
26902c84 5bbf 46c7 83e6 e0041829f05d

26902c84 5bbf 46c7 83e6 e0041829f05d
 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये  ‘वृक्ष लागवड सप्ताह’ निमित्त आज वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी शाळेला भेट दिली.

 

शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. महाजन यांनी श्री.बिऱ्हाडे यांचा शाल- श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. याप्रसंगी ‘वृक्ष लागवड सप्ताह’चे औचित्यसाधून श्री.बिऱ्हाडेंच्या हस्ते शाळेतील मुले व शिक्षक वृंदा सोबत शाळेच्या परीसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये नीम , चिंच , शिसम , गुलमोहर , चिचोला अशा झाडांच्या रोपांचा समावेश होता. यावेळी श्री.बिऱ्हाडे यांनी गुणवत्ता विकास – डिजीटल वर्ग अशा अनेक विषयांवर शिक्षक बंधु – भगिनी यांच्याशी चर्चा केली. शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्ही.टी. माळी तर आभार एस.व्ही. आढावे यांनी मानले.


Protected Content

Play sound