भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील नेहरू विद्या मंदिरच्या भव्य पटांगणात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील व शाळेचे पर्यवेक्षक तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जिल्हा संघटक एस. एस. अहिरे सर यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
वाढत्या प्रदूषणाला आळा बसण्यासाठी वृक्षारोपण करतांना आपण वड, पिंपळ, कडूनिब, चिंच, आवळा, आंबा, कांचन, अशी आक्सीजन मोठ्या प्रमाणात निर्माण करणारी व पर्यावरणाला पूरक असणारी झाडे लावावीत असे मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी मार्गदर्शन करताना सागितले.
जिल्हा संघटक, शाळेचे पर्यवेक्षक एस. एस. अहिरे सर यांनी मोठ्या प्रमाणात देशी झाडांचेच वृक्षारोपण केले असून भविष्यातही निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली झाडांचे रोपण करून संवर्धन करू असे यावेळी मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी मार्गदर्शक सुरेंद्र पाटील, शाळेतील शिक्षक व्ही.टी. रोटे, एल. एस. पाटील, व्ही.जे. पाटील, ए. डी. महाजन, सौ. एस. एस. सरोदे, ए. पी. कोल्हे यांनी ही वृक्षारोपण करून सहकार्य केले व वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारीही घेतली.