रावेर प्रतिनिधि । येथील सामाजिक वनिकरणाच्या नर्सरी मधुन आज पासून ग्राम पंचायतींना रोपे वाटपास प्रारंभ करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी बोहर्डे, पातोंडी गावांपासुन सुरुवात झाली असून प्रत्येक ग्राम पंचायतीना सुमारे तीन हजार दोनफशे रोपे पुरविण्याची जबाबदारी शासनाने सामाजिक वनिकरणाला दिलेली आहे. येथील सामाजिक वनिकरणाच्या नर्सरी मध्ये सुमारे तीन लाख चार हजार विविध जातीचे रोपे उपलब्ध असून तालुक्यातील सुमारे ९५ ग्राम पंचायतीना ही रोपे पुरवयाची आहेत. सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल अर्शद मुलानी, वनरक्षक आयशा पिंजारी व मजूरांनी परिश्रमपूर्वक ही नर्सरी जगविली आहे.
या नर्सरीमध्ये गुलमोहर, करंज,चिंच,आवडा,शेवगा,बांबूळ,शिसू,वड,उंबर,पडस, बेहडा, सनमोहर, बेल,सागवान आदी विविध प्रकारचे रोपे उपलब्ध आहेत. तसेच पारोळा व धरणगाव येथे सुध्दा येथून १ लाख ५० हजार रोपे सामाजिक वनीकरण पुरवठा करणार आहे. नर्सरीचे रोपे जगवीण्यासाठी सर्व सेंद्रीय खत, नदीचा गाळ, व मातीचा पुरेपुर वापर करण्यात आला आहे. एकूण चौदा प्रकारच्या जातीचे रोपे आमच्या कडे उपलब्ध असून ही सर्व रोपे ग्राम पंचायतींना आम्ही पुरविणार असल्याचे वनक्षेत्रपाल अर्शद मुलानी यांनी सांगितले.