जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अंड मॅनेजमेंट मध्ये एम.बी.ए. शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आज शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी एसबीआय म्युच्युअल फंड कंपनीतर्फे प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला.
एसबीआय म्युच्युअल फंड कंपनीचे जळगाव शाखा प्रबंधक मनोज वाणी यांनी आधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि मुलाखती घेतल्या. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एम.बी.ए. अंतिम वर्षाच्या १७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
प्लेसमेंट ड्राइव्हच्या यशस्वीतेसाठी कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डायरेक्टर प्रा. संजय दहाड, विभाग प्रमुख प्रा. हर्षा देशमुख यांचे सहकार्य लाभले. समन्वयक म्हणून प्रा. हेमंत धनधरे यांनी परिश्रम घेतले.