नवी दिल्ली प्रतिनिधी । अर्थमंत्री पियुष गोयल संसदेत पोहचले असून ते लवकरच या वर्षाचा अंतरीम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे उपचारासाठी अमेरिकेत असल्यामुळे या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तेच आज मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आता ते संसद भवन परिसरात दाखल झाले आहेत. आज हसर्या चेहर्याने गोयल हे संसदेत आले असल्यामुळे आज ते सर्वसामान्यांना नेमकी काय भेट देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.