Home क्राईम पिंप्राळा हुडको खून प्रकरण: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या !

पिंप्राळा हुडको खून प्रकरण: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे प्रेम प्रकरणातून २८ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात १० जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी सात मारेकऱ्यांना अटक केली आहे. मुकेश रमेश शिरसाट वय-२८, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.

मुकेश याने पूजा यांच्याशी चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. याचा राग मनात ठेवून गेल्या ४ वर्षांपासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या आणि त्रास देणे सुरू होते. रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मुकेश शिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद निर्माण झाला. थोड्याच वेळानंतर हा वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडील ८ ते १० जणांनी कोयता व इतर धारदार साहित्यांनी मुकेश शिरसाट यांच्यासह त्याच्या नातेवाईकांवर वार करून जखमी केले. दरम्यान यामध्ये मुकेश शिरसाट यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला होता.

मुकेशच्या मृत्यूची वार्ता करताच पिंप्राळा हुडकून येथील नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला होता. दरम्यान या घटनेबाबत मुकेशचा नातेवाईक सोनू रमेश शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी २.३० वाजता मारहाण करणारे सतीश जुलाल केदार, प्रकाश शंकर सोनवणे, सुरेश भुताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे, राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी राजू गांगले, बबल्या राजू गांगले यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा सर्व रा. पिंप्राळा हुडको जळगाव यांच्या विरोधात विविध कलमान्वये रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एकूण १० जणांना पैकी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित फरार झालेल्या संशयीतांचा शोध घेणे सुरू आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound