पिंपळगाव पोलिसांनी केले घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पिंपळगाव (हरेश्वर) परिसरात होणाऱ्या चोऱ्या तसेच घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत पिंपळगाव पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद केले आहे.

पिंपळगाव (हरेश्वर) परिसरात होणाऱ्या चोऱ्या तसेच घरफोडी पोलिसांसह नागरीकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होत्या. त्यासंदर्भात पोलीस अधिक्षक जळगाव प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे तसेच पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांनी अशा प्रकारच्या गुन्हयांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

तसेच दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री पिंपळगाव (हरेश्वर) येथील जिओ सर्विस सेंटर येथे घरफोडी चोरी झाली होती. त्यात २ लाख १२ हजार रूपयांचे मोबाईल, टॅब, लॅपटॉप, इंटरनेट राऊटर इत्यादी सामान चोरी गेले होते. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांनी भेट देउन महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यानुसार तपास सुरू करून पोलीस स्टेशन पिंपळगाव (हरेश्वर) येथील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस उपनिरिक्षक अमोल पवार, पोलिस कॉन्स्टेबल रणजित पाटील, गोकुळ सोनवणे, पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, अमोल पाटील, पोलीस शिपाई जितेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित निकम, संभाजी सरोदे, पोलीस शिपाई पंकज सोनवणे यांचे एक पथक तयार करून त्यांचेकडे सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी सोपवित व सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने सूचना दिल्या.

त्यानुसार पथकाने गुन्हयांच्या घटनास्थळाचे आजूबाजूच्या परीसरातील सी.सी.टी.व्ही.ची पाहणी केली असता तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने राहुल दिगंबर राउतराय रा. निंभोरी ता. पाचोरा व किरण बल्लु पवार या आरोपींचा शोध घेवून मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली. त्यांचेकडून गुन्हयातील चोरी गेलेला मुददेमाल त्यात १ लॅपटॉप, ५ टॅब, जिओ कंपनीचे मोबाईल, १ इंटरनेट राऊटर असा एकूण २ लाख १२ हजार ४३५ रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे ५ दिवसापूर्वीच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दाखल दोन गुन्हे उघडकीस आणून त्यातील आरोपी शिवानंद दत्तात्रय महाजन यास अटक करून त्याचेकडून वरील दोन्ही गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करण्यात आला होता.

हि कारवाई पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे तसेच पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पिंपळगाव (हरेश्वर) येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस उपनिरिक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार राकेश खोंडे, रणजित पाटील, गोकुळ सोनवणे, पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा, अरून राजपुत, शिवनारायण देशमुख, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, अभिजित निकम, संभाजी सरोदे, पंकज सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, विनोद पाटील यांनी केली आहे.

Protected Content