नशिराबाद लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावातील खंडेराव मंदिराजवळ झालेल्या अपघातात ६४ वर्षीय वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता घडली होती. या संदर्भात चौकशी अंती शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात पिकअप वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनंदा तुळशीराम भोळे (वय ६४, रा.नशिराबाद जळगाव) या वृद्ध महिला त्यांची दुचाकी (एमएच १९ एव्ही ६४१३) ने १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शेतातून घरी येत असताना (एमएच ४६ एएफ २१८९) त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या संदर्भात शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्यादीनुसार पिकअप वाहनावरील अज्ञात चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.