Home क्रीडा फिनिक्स 2K26 बक्षीस वितरण समारंभ उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा दिमाखदार गौरव

फिनिक्स 2K26 बक्षीस वितरण समारंभ उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा दिमाखदार गौरव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना वाव देणाऱ्या ‘फिनिक्स 2K26’ या बहुप्रतिक्षित तांत्रिक व सांस्कृतिक स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण गौरव करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन त्यांच्या यशाचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला इग्नाइट अकॅडमी, पॅशन सॉफ्टवेअर जळगाव, किरण अकॅडमी पुणे, सॉफ्टेड, इलेक्ट्रोसॉफ्ट आणि एम सॉफ्ट या प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि सर्जनशीलतेचे कौतुक करत त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयातर्फे प्रथम पारितोषिक म्हणून 3000 रुपये, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 1000 रुपये तसेच ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यातील स्पर्धात्मकता अधिक वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या नवोन्मेषी विचारसरणीचे आणि मेहनतीचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा वाघुळदे आणि रिद्धी भिरुड या विद्यार्थिनींनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. देवेंद्र फेगडे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धांमध्ये कोड वॉरमध्ये प्रतीक भदाणे यांनी प्रथम, रीवा चव्हाण द्वितीय आणि हर्षल बोरसे तृतीय क्रमांक मिळवला. कॅड गुरु स्पर्धेत प्रणित साळुंखे प्रथम, पूर्वेस अत्तरदे द्वितीय आणि पंकज साळी तृतीय ठरले. फॉर्म्युला फनमध्ये ओम पाटील प्रथम, डिंपल भंगाळे द्वितीय आणि दुर्गेश चौरे तृतीय ठरले.

बॅटल ऑफ ब्रेन्समध्ये पौर्णिमा थोरात प्रथम, पंकज सोनार द्वितीय आणि क्षितिज शहा तृतीय ठरले. वेब क्राफ्ट एआयमध्ये राज सूर्यवंशी प्रथम, मेघराज दंडगव्हाळ द्वितीय आणि मोनिका राखंडे तृतीय ठरले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये देवयानी महाजन व चिन्मय पाटील प्रथम, अथर्व देशमुख व राजवर्धन ठाकूर द्वितीय आणि गौतम चंदनी तृतीय ठरले.

शार्क टॅंक स्पर्धेत भावेश राठोड व कुणाल देवरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रांजल बावणे द्वितीय आणि निर्मल वरखेडे व गायत्री व्यवहारे तृतीय ठरले. फ्री फायर स्पर्धेत शिवराज पाटील, कार्तिकेश पाटील, उत्कर्ष चुडीवाले व रोहित पाटील यांच्या संघाने प्रथम, तर मंगेश महाजन, यश पाटील, आदर्श कोळी व प्रज्वल पाटील यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.

बीजीएमआय स्पर्धेत कुणाल कावळे, परेश तायडे, यश कोल्हे व सोहन (व्हर्टेक्स गॅंग) यांनी प्रथम, तर वरून चव्हाण, ऋषी सुतार व जयेश तायडे (चॉकलेट गॅंग) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.


Protected Content

Play sound