Home Cities जळगाव भिडे गुरुजी व केंद्रीय मंत्र्यांकडून पाटील परिवाराचे व्यक्तिगत सांत्वन

भिडे गुरुजी व केंद्रीय मंत्र्यांकडून पाटील परिवाराचे व्यक्तिगत सांत्वन

0
363


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाटील कुटुंबियांच्या मातृछायेचा आधार हरपल्याने संपूर्ण खानदेशासह राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. स्व. गोदावरी आई पाटील यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या भेटीवेळी भिडे गुरुजींनी गोदावरी आई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या धार्मिक, पारंपरिक व कुटुंबप्रमुख या भूमिकेचा उल्लेख करत, पाटील कुटुंबातील एक महत्त्वाचा आधार हरपल्याचे त्यांनी नमूद केले. पाटील परिवाराने दिलेल्या सामाजिक योगदानाबाबतही त्यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनीही पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. त्यांनी स्व. गोदावरी आई यांचे स्मरण करत त्यांच्या शांत आत्म्यास सद्गती लाभावी, अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व सुभाषदादा पाटील यांना धीर देण्याचे प्रयत्न केले.

सांत्वनपर भेटीदरम्यान पाटील कुटुंबातील सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, तसेच इतर नातेवाईकही उपस्थित होते. पाटील कुटुंबीयांनी या भावनिक क्षणी भेट देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. स्व. गोदावरी आई यांचे सात्विक, समर्पित व संयमी व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या पश्चातही अनेकांसाठी प्रेरणादायी राहील, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.


Protected Content

Play sound