जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ममुराबाद येथील माहेरवाशिणीला कार घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी चंद्रपूर येथील पतीसह सासच्यांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, रूपाली निलेश दांडगे (वय-२०, रा. ममुराबाद ता.जि.जळगाव) या विवाहितेचा चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथील ऑर्डनर्स फॅक्टरी येथील निलेश भागवत दांडगे यांच्याशी सन २०१९ मध्ये झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले त्यानंतर पती निलेश दांडगे याने विवाहितेने माहेरहून कार घेण्यासाठी ५ लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ आणि मारहाण केली. सासु उषा भागवत दांडगे, सासरे भागवत किसन दांडगे आणि नणंद वंदना भागवत दांडगे यांनी पतीला पाठबळ देत आहे. हा प्रकार सहाय्य झाल्याने विवाहित माहेरी निघुन आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय चौधरी करीत आहे.