भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील विविध समस्यांवर नगराध्यक्ष व नगरपालिका प्रशासन यांनी उपाययोजना करावी यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस,शिवसेना व जनआधार विकास पार्टीच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
शहरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहे. तरी देखील नगराध्यक्ष, नगरपालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. तसेच शहरातील अमृत योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागण्या जो पर्यंत मान्य होत हम नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. नगरपालिका विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. तहसीलदार दिपक ढिवरे यांनी आंदोलनस्थळी आल्यानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. माजी उपनगरध्यक्ष उमेश नेमाडे,राष्ट्रवादी शहरध्यक्ष नितिन धांडे,भिमा कोळी, भुटासिंग चितोडिया, मुन्ना सोनवणे, संजू चव्हाण, कॉंग्रेस शहरध्यक्ष रविंद्र निकम, अनिता खरारे, संजु खडसे, विलास खरात आदी शेकडो कार्यक्रते उपस्थित होते. शहरातील गांधी पुतळ्याजवळ गेल्या अर्ध्या तासापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने चारही बाजूला दिड किलोमीटरपर्यंत वाहने थांबून होती.