![rakshatai khadse raver loksabha faijpur rakshatai khadse raver loksabha faijpur](https://livetrends.news/wp-content/uploads/2019/04/rakshatai-khadse-raver-loksabha-faijpur-300x200.jpg)
भुसावळ (प्रतिनिधी) फैजपूर तालुक्यातील आमोदे येथील ग्रामस्थांनी आज मोठ्या उत्साहात भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांचे स्वागत केले. आपण माझ्यावर दाखवलेले प्रेम व उबदार माया पाहून मला नेहमीच आनंद मिळतो. यापुढे देखील आपण माझ्यावर असेच प्रेम कराल व मला आपली अशीच साथ लाभेल अशी मी आशा करते, असे रक्षाताई खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे, लोकसभा संयोजक व जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिराकाका चौधरी, नगराध्यक्षा महानंदाताई होले, माजी सभापती भरत महाजन, माजी नगराध्यक्ष होमराज चौधरी, शहराध्यक्ष संजय रल, यशवंत तळेले, महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.