जळगाव प्रतिनिधी – पीपल्स पीस फाउंडेशन हि समाज कल्याणकारी उपक्रम राबवणारी सामाजिक संस्था असून अनेक समस्यांचे मुळ असलेली बेरोजगारी. हि रोजगार उपलब्ध करून देत कमी करणे व त्या माध्यमातुन अपराधांचे प्रमाण कमी करणे हा संस्थेच्या अनेक प्रमुख उद्देश्यांपैकी एक उद्देश आहे. त्याच उद्देश्याने पीपल्स पीस फाउंडेशन आणि जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ४ व ५ मे २०१९ रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जॉब फेअर फेस्टिवल २०१९ या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या रोजगार मेळाव्यात गरजूंनी सहभागी होण्याचे आवाहन पीपल्स पीस फाउंडेशनने पत्रकार परिषदेत केली.
यावेळी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीं ऑनलाईन -ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करत आहेत. प्राप्त झालेल्या, अर्ज केलेल्या उमेदवारांना मेसेज व मेल आणि व्हाटस अप्प दवारे वेळ, ठिकान तसेच इतर तपशील कळविला जात आहे. 4 व 5 मे रोजी हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी सकाळी १०.३० ते सायं. ५ या वेळेत होणा-या या रोजगार मेळाव्यात अनेक उद्योग समूह सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये सोयो सिस्टिम्स, एस.के. ट्रान्सलाईन्स, रॉयल फर्निचर मिम्स, बियाणी ग्रुप, व्ही.पी. भंडारी, आर.जी. इंटरप्राइजेस, धारा ऍडव्हायजरी सर्व्हिसेस, मारुती सुझुकी, सातपुडा आटोमोबाइल्स प्रचिती मीडिया, नवरंग टी, अमर डेअरी, लक्ष्मी ग्रुप ऑफ़ कंपनी व इतर अनेक कंपन्या,उद्योग समूहांचा समावेश असुन अनेक पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार दिला जाणार आहे. तसेच ज्या तरूणांनी नोंदणी केली नाही अश्यांनी शनिवार 4 मे रोजी 10.30 ते 2.30 वाजेदरम्यान स्वतंत्र डेस्क नाव नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ऑनलाईनला 800 जणांची नोंदणी करण्यात आली तर ऑफलाईनच्या माध्यमातून 800-900 जणांची नोंदणी झाली आहे. जळगाव एमआयडीसह इतर ठिकाणच्या 15 कंपन्यांकडून जवळपास 550 जागा उपलब्ध झालेले आहे.
सदर मेळाव्यासाठी अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे मार्गदर्शन मिळत असून फाउंडेशनच्या अध्यक्षा मनजीत कौर मतानी, सुरेश हसवानी, मनोज बियाणी, किशोर ढाके, हेमंत कोठारी, सचिन घुगे, पंकज दारा, सुनील पाटील, आनंद गांधी, अमर खत्री, वर्धमान भंडारी, इम्रान शेख, प्रदीप वाघ, एम्लॉयमेंटच्या अनिसा तडवी, निलेश वाघ आदींचे परिश्रम लाभत आहे.
मेळाव्याविषयी अधिक माहिती
प्रचिती मीडिया दुसरा मजला, सांची प्लाझा, बी. जे. मार्केटजवळ जळगाव येथे तसेच ९०२१८८५९९५ या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध आहे तरी अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांनी त्वरित https://peoplespeacefoundation.com/job-fair या लिंकद्रावारे नोंदणी करून जास्तीत जास्त युवक यवतींनी दिलेल्या कालावधीत व वेळेत उपस्थित राहून या सूवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.