पोर्ट ब्लेअर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज देशात लोकसभा निवडणूकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पाडली आहे. यंदाच्या मतदान प्रक्रियेत ऐतिहासिक घटना घडली आहे. अंदमान निकोबार या बेटावरील शोम्पेन समाजाच्या लोकांनी पहिल्यादांच मतदान केले आहे. या आधी त्यांनी कधीही आपले मतदान केले नव्हते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोम्पेन हट नावाने मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तेथे शोम्पेन समाजाच्या ९८ मतदारांनी मतदान केले.
शोम्पेन समाज हा निकोबार बेटावर वास्तव्य करत असून या समाजाचे लोक लाजाळू स्वभावाचे असतात. या समाजाचे लोक शारिरीकद्ष्टया प्रचंड कमजोर असतात आणि या समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने मुख्य प्रवाहात आलेला नाही आहे. हे लोक मंगोलियन जातीचे असून शोम्पेन भाषा बोलतात. भारताच्या स्वतंत्राला ७७ वर्ष झाली तरी या समाजाच्या लोकांनी मतदान केले नव्हते.