चोपडा/यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेले सत्यमेव जयते आंदोलनाचा सहावा दिवस उगवला तरी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अद्याप आंदोलनाकडे पाठ का फिरवल्यामुळे तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे तहसीलदार लक्ष का देत नाही असा सवाल आता तालुक्यातील जनतेला पडला असून आंदोलनकर्ते सहाव्या दिवशी ही न्याय हक्काच्या लढाईसाठी ठामपणे बसले आहेत.चोपडा तालुक्यातील भ्रष्ट ग्रामसेवक कुंदन कुमावत यांच्या बदलीसाठी अनेक महिन्यापासून अर्ज दिले आहेत. तरीही साधी चौकशी होत नाही,तसेच तालुक्यातील जनतेला रेशनकार्डासाठी वणवण भटकावे लागत असून तहसीलदार हे नागरिकांना न्याय देत नाही. भूमिअभिलेख मधील कर्मचारी काम वेळेवर करत नाही, तालुक्यात व शहरातील खड्ड्याची समस्या, कृषी, बांधकाम विभाग, पंचायत समिती, पाणीपुरवठा विभाग, रोजगार हमी योजना व तालुक्यातील सर्रास होत असलेली वृक्षतोड, अश्या विविध विषयासाठी आंदोलन सुरू असून शासन मात्र जनतेची दिशाभूल करत आहे.
आंदोलन स्थळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी झेडपी अध्यक्ष गोरख तात्या पाटील, इंदिरा पाटील, चोपडा साखर कारखानाचे माजी चेअरमन घनश्याम पाटील,जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी सभापती कांतीलाल पाटील वर्डी, माजी झेडपी सदस्य प्रभाकर सोनवणे, गोकुळ आबा पाटील, माजी झेडपी सदस्य सुनील पाटील वाळकी, डीपी साळुंखे, मठाधिपती भैय्यादादा महाराज, सरचिटणीस शरद पवार गट लहुश धनगर,माजी नगरसेवक रमेश शिंदे,राजू देशमुख, हुसेन पठाण,डॉ कांतीलाल पाटील, विनायक रामदास पाटील, माजी चोसाखा व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, दीपक सोनवणे, भुपेंद्र गुजराथी, शांताराम तोताराम सपकाळे,गोपाळराव सोनवणे, हिम्मतराव पाटील,भाजपचे प्रदीप पाटील, धंनजय पाटील,नरेंद्र पाटील,डॉ रवींद्र पाटील, गोपाळ नवल धनगर,सतीश पाटील जेडीसीसी बँक नंदू धनगर यांनी भेट देऊन बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा दर्शवला.
तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील शहर अध्यक्ष गिरीश देशमुख जिल्हा संघटक परेश देशमुख, महिला शहर अध्यक्ष स्वाती बडगुजर,युवा शहर अध्यक्ष शुभम सोनवणे,सुरेश साळुंखे सरचिटणीस,सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे,उपाध्यक्ष गोपाल दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बडगुजर, हे उपोषण स्थळी बसून आहेत. अद्याप ही उपोषणास शासनाने भेट दिली नाही म्हणून ३० रोजी आंदोलन कर्ते यांनी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना निवेदन दिले त्यात म्हटले आहे की ३०रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिया आंदोलन करण्यात येईल असं पत्र देण्यात आले आहे.