जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागकडील शासन निर्णयानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या निवृत्तीवेतनाची 1 जून, 2004 ते 31 जानेवारी, 2019 या कालावधीतील त्या-त्या वेळी देय असलेल्या दराने थकबाकी अदा करावयाची आहे. यानुसार त्यांनी किंवा वारसांनी 18 ते 27 सप्टेंबरच्या दरम्यान, तहसील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानुसार 1 जून, 2004 ते 31 जानेवारी, 2019 या कालावधीतील थकबाकी रक्कम देय असलेले केंद्रशासन स्वातंत्र्य सैनिक/त्यांच्या विधवा पत्नी किंवा पती/ त्यांच्या पश्चात निवृत्तीवेतन घेणाऱ्या अविवाहित मुली/अन्य वारस यांनी 18 ते 27 सप्टेंबर, 2019 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी, जळगाव येथे गृह शाखेत किंवा संबंधित तालुका तहसिलदार यांचे कार्यालयात निवृत्तीवेतन मंजूरीचे आदेश क्रमांक, संपूर्ण नाव व पत्ता, संपर्कासाठी दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक, पीपीओ क्रमांक, निवृत्तीवेतनाचे बँक स्टेटमेंट, निवृत्तीवेतन घेणारी व्यक्ती मयत असल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारस असल्याचे प्रमाणपत्र आदि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत. असे अपर जिल्हाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.