मूळचा चोपडा तालुक्यातल्या विटनेर येथील रहिवासी अजय भोजराज रायसिंग या विद्यार्थ्याने टोकरे कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र मध्ये उल्हासनगर येथिल विभागीय दंडाधिकारी यांच्याकडून घेतले होते. जातप्रमाणपत्र देतांना टोकरे कोळी या नावातील स्पेलिंग Tokre ऐवजी Tokare असे झाले होते. खरं तर ही किरकोळ चुक होती. पण या मुळे संबंधीत विद्यार्थ्याला जातवैधता मिळायला अडचण निमाण झालेली होती. याबाबत जळगाव येथील प्रर्वतन बहुउद्देश्यीय संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत शिरसाठ यांनी आयुक्त, आदिवासी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्यांनीदेखील या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे विद्यार्थ्याचे पालक भोजराज रायसिंग यांनी याचिका क्रमांक ७०२९/२०१९ नुसार उच्च न्यायालय मुंबई येथे धाव घेतली होती.
यावर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने स्पेलिंग मिस्टेक सारख्या किरकोळ चुकीमुळे विद्यार्थ्यांना न्यायालयाची पायरी चढावी लागते याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच न्यायालयाचा वेळ विनाकारण खर्च केल्याबद्यल खंडपीटाने महसुल प्रशासनावर ताशेरे ओढत संबंधीत विद्यार्थ्याला दोन आठवडयात जात प्रमाणपत्र दुरुस्त करुन देण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणी विद्यार्थ्याला २५,००० रुपये नुकसान भरपाई संबंधीत प्रांताधिकार्यांनी अजय भोजराज रायसिंग याला चार आठवडयाच्या आत दयावी असे आदेश दिलेले आहेत. फिर्यादीच्या बाजूने अॅड रामचंद्र मेंदाळकर यांनी काम पाहिले. अजय भोजराज रायसिंग यास श्यामकांत शिरसाठ अध्यक्ष प्रर्वतन बहुउद्येशीय संस्था व मदन शिरसाठ यांनी सहकार्य केले.