मुंबई प्रतिनिधी । रिलायन्स कंपनी आणि याचे प्रमुख मुकेश अंबानी यांना कंपनीच्या शेअर ट्रेडींगमध्ये फेरफार केल्याप्रमरणी सेबीने तब्बल ४० कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे.
याबाबत वृत्त असे की, रिलायन्स पेट्रोलियम ही भांडवल बाजारात स्वतंत्र लिस्टेड कंपनी होती. मार्च २००७ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स पेट्रोलियमचे ४.१ टक्के शेअर विकण्याची घोषणा केली. कंपनीचे भाव कोसळल्यानंतर कंपनीने नोव्हेंबर २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात आले.
दरम्यान, सेबीने केलेल्या चौकशीवेळी शेअरचे भाव प्रभावित करण्यासाठी हे व्यवहार चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कंपनीच्या शेअर ट्रेडिंगमध्ये फेरफार केल्याबद्दल सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तिचे चेअरमन मुकेश अंबानी यांना ४० कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी, तर अंबानी यांना १५ कोटींचा दंड करण्यात आला आहे.