Home क्राईम अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला उडविले; प्रौढ जागीच ठार

अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला उडविले; प्रौढ जागीच ठार


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली ते भोकर दरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने पायी जाणाऱ्या प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. याबाबत सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश नाना बारेला वय ४५ रा. भोकर ता. जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील भादली ते भोकर रस्त्यावरून प्रकाश बारेला हा रविवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास भोकर येथे जाण्यासाठी पायी निघाला होता. त्यावेळी त्यांच्या मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रकाश बारेला याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर दुचाकी चालक हा वाहन घेवून पसार झाला होता. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ अनिल बारेला याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिार्यद दिली आहे. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound