पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पवित्र रमजान महिन्यानिमित्त पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता शांतता समितीची बैठक आणि इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलिस अधिकारी आणि मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या वेळी पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पो.नि. अशोक पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोउनि परशुराम दळवी, पोउनि योगेश गणगे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी उपस्थित होते.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या प्रसंगी सहभाग घेतला. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जिल्हा सचिव शेख इरफान मन्यार, अजहर खान, शेख इस्माईल शेख फकिरा, तसेच समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात सामाजिक ऐक्य आणि बंधुत्वाचे महत्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित मान्यवरांमधून अजहर खान, शेख इस्माईल शेख फकिरा, सचिन सोमवंशी, पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी, पो.नि. अशोक पवार आणि डी. वाय. एस. पी. धनंजय येरुळे यांनी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आणि शांतता, एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी इफ्तारचा आनंद घेतला आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश दिला.
खाली पहा याबाबतचा व्हिडिओ :