पहूर ,ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील लेलेनगर परिसरात रात्री दोन गटात हाणामारी झाल्यानंतर वातावरण तणावाचे बनले असतांनाच गुरूवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणावरून दोन गटात हाणामारी झाली. पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व पहुर पोलीसांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आले. सदर घटनेप्रकरणी ४८ जणांवर पहूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून अजून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या संघर्षानंतर गुरूवारी सकाळी पहूर पोलीस स्टेशन येथे शांतता कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वच उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, संजय पाटील, डॉ. मोईनुद्दीन, अरूण घोलप, बाबुराव घोंगडे यांच्या सह आदींनी मनोगत व्यक्त केले.
गुन्हा दाखल झालेल्यांपैकी निर्दोष लोकांची नावे काढण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्याकडे केली. तसेच यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे म्हणाले की, जे नव्हते त्यांच्यावर अन्याय होणार नाही. असे सांगत गावात शांतता रहावी यासाठी अनमोल मार्गदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे, पोलीस निरीक्षक सचिन सानप, माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बनकर, माळी समाज माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे, अशोक जाधव, पत्रकार गणेश पांढरे, सरपंच पती शंकर जाधव, उपसरपंच राजु जाधव, ग्रामपंचायत सदस्य तेजराज बावस्कर, शे.युसूफ शे.गयासोद्दीन, शेख अमीन, शरद पांढरे, ईका पहेलवान, मुन्ना पठाण, रविंद्र मोरे, इस्माईल, शेख सलीम, सचिन कुमावत, यांच्या सह आदी उपस्थित होते.
दरम्यान, पहूर येथील लेलेनगर परिसरात घडलेल्या घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर पोलीस निरीक्षक सचिन सानप व वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.