Home राजकीय पवार न खेळताच बाहेर पडले – मोदी

पवार न खेळताच बाहेर पडले – मोदी


images 9

अकलूज (सोलापूर)  शरद पवार निवडणुकीच्या मैदानात ओपनिंग बॅटसमन म्हणून आले, परंतु १२ वा गडी म्हणून न खेळताच बाहेर पडले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील पवारांच्या माघारीची खिल्ली उडवली. दिल्लीचा परिवार तुमचा मॉडेल आहे़. शरदराव तुम्ही तुमचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी होती, असा टोलाही त्यांनी लगावला. येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

 

यावेळी ते पुढे म्हणाले की, गरिबांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा आम्ही दिली. सिंचन विद्युतीकरण यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. ऊस उत्पादकांचे भले लक्षात घेता त्यांच्या उत्पन्नाची साधने आम्ही वाढवत आहोत. इथेनॉलच्या उत्पन्नासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. हे सर्व शरद पवार करू शकले असते, परंतु आपली साखरेची दुकाने सुरळीत चालावित, यासाठी त्यांनी या बाबींकडे लक्ष दिले नाही. पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची टीकाही मोदी यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound