पाचोरा नंदू शेलकर । एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्षपदी पवनराजे सोनवणे यांची सर्व भिल्ल समाज बांधवांच्या सहमतीने संस्थापक तथा प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दरम्यान, गेल्या २० वर्षांपासून शिवाजीराव ढवळे यांच्या नैतृत्वाखाली त्यांनी अनेक तळागाळातील कार्यकर्ते जोडुन एकलव्य संघटना बळकट केली. प्रसंगी समाजाच्या हितासाठी उपोषण, आंदोलन, मोर्चे काढुन संघटना नावारुपाला आणली. त्याच संघटनेच्या जोरावर शिवाजीराव ढवळे यांची नाशिक म्हाडावर वर्णी लागली. गेल्या दोन वर्षांपासून भिल्ल समाजाच्या मुलभूत गरजा सोडविण्यासाठी शिवाजीराव ढवळे हे असमर्थ राहिले. अशी माहिती ही पवनराजे सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कुठहीली पुर्व सुचना न देता शिवाजीराव ढवळे यांनी जळगांव जिल्ह्यासह राज्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भिल्ल समाजाला शिवाजीराव ढवळे यांचे नैतृत्व मान्य नसल्याने दि. १३ रोजी एकलव्य संघटना जळगांव जिल्ह्याची बैठक भडगाव येथे संपन्न झाली. या बैठकीला जळगांव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी भिल्ल समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी भिल्ल समाज बांधव यांच्या सर्वांच्या उपस्थिती जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाच्या हितासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्षपदी पवनराजे सोनवणे यांची उपस्थित सर्व भिल्ल समाज बांधव यांच्या सहमतीने संस्थापक तथा प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अशी माहिती नुतन प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एकलव्य संघटना जळगांव जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ व उपस्थित सर्व तालुका कमिटी व जिल्हा कमिटी तसेच भिल्ल समाज बांधव यांच्या कडून नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांचा सत्कार करण्यात आले तसेच यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत एक ठराव करण्यात आले. त्यात एकलव्य संघटनेचे पहिले अधिवेशन दि. २३ सप्टेंबर रोजी चाळीसगावं येथे तंट्यातात्या भिल्ल यांच्या जयंती निमित्त घेण्यात येणार आहे. अशीही पवनराजे सोनवणे यांनी घोषणा जाहीर केली. तसेच एकलव्य संघटनेचे प्रदेश कमिटीचे सर्व पदे व सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदे येत्या पंधरा दिवसात निवड करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी बैठकीला हजारोंच्या संख्येने आदिवासी भिल्ल समाज बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती ही नुतन प्रदेश अध्यक्षपदी पवनराजे सोनवणे यांनी पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/851674672441576