यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुकाध्यपदी विरावली येथील पवन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पाटील यांनी निवड पत्र दिले.
पवन पाटील हे विरावलीचे ग्रामपंचायत सदस्य असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तसेच राकॉचे युवक तालुका उपाध्यक्ष म्हणून जवाबदारी सांभाळली. याबैठकीला यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, चोपडा पंचायत समितीचे सभापती डी.पी.साळुंखे, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय पाटील, बोदडे नाना, फैजपूरचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, विकासो संचालक किरण पाटील, अन्वर सईद, जाकीर भाई, ललित पाटील, राहुल चौधरी, रोहन महाजन, अशोक भालेराव, मोहसीन खान, चंद्रकांत येवले, विशाल पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील, संचालक गणेश पाटील, सारंग अडकमोल, मनोज तडवी, गजानन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील, भैय्या पाटील, योगेश पाटील, निलेश बेलदार , गिरीश पाटील , राजेश अडकमोल , कोमल सिंग पाटील , मनू महाजन, विनोद पाटील,तुषार येवले ,पितांबर महाजन, भगवान बर्डे आदी उपस्थित होते.