धरणगाव, प्रतिनिधी | येथील समस्त पाटील समाज पंच मंडळ, लहान माळी वाडा, यांच्या वतीने जेष्ठ सदस्य बाबुराव गिरधर पाटील यांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल त्यांचा आज (दि.४) यथोचित सन्मान करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , कोणत्याही समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी नेतृत्व आणि त्यासोबत दातृत्व या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. सामाजिक काम करतांना तुमच्याकडे वेळ असेल तर वेळ द्या आणि तो नसेल तर आर्थिक सहाय्य करून समाजाला पुढे नेण्याचे काम केले पाहिजे. प्रत्येक समाजामध्ये असे काही दानशूर व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे समाजाला दिशा मिळत असते, असाच काहीसा अनुभव आज आला. कै.सौ. पद्माबाई गिरधर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व समाजाचे जेष्ठ सदस्य बाबुराव गिरधर पाटील यांचेकडून ‘जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सप्ताहाला’ रुपये २५,००० रोख देणगी स्वरूपात पाटील समाज पंच मंडळाला देण्यात आले.
या दानशूर व्यक्तींच्या पूर्ण परिवाराने भारतीय रेल्वेत सेवा दिली आहे. बाबुराव पाटील यांचे चिरंजीव नाना पाटील व त्यांचे नातू सागर पाटील हे देखील रेल्वे कर्मचारी आहेत. आज या दानशूर व्यक्तींचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समस्त पाटील समाज पंच मंडळ, लहान माळी वाडाचे माजी अध्यक्ष सुखदेव पाटील, विठ्ठल पाटील, माजी सचिव माधवराव पाटील, विद्यमान अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, सदस्य- कैलास पाटील, दत्तू पाटील, चुडामण पाटील, मोहन पाटील, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, आनंद पाटील, वाल्मिक पाटील, जितेंद्र पाटील (जितू महाराज) परशूराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगेश पाटील, शिपाई अशोक झुंझारराव यांच्यासह देविदास पाटील , पंकज पाटील, कमलेश पाटील, नकुल पाटील, अक्षय पाटील, जयेश पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.