अमळनेर प्रतिनिधी । शहरातील लायन्स क्लब व नायरा क्लिनीकच्या वतीने मोफत त्वचारोग शिबीर घेण्यात आले. या शिबीरात रूग्णांनी प्रतिसाद मिळाला यात १४४ जणांनी शिबीराचा लाभ घेतला.
शहरातील लायन्स क्लब व नायरा क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगावातील त्वचारोग तज्ञ डॉ. स्वप्निल पाटील यांच्या सहकार्याने त्वचारोग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १४४ पुरुष,महिला व मुलींची तपासणी केली.
याप्रसंगी लायन्सचे प्रेसिडेंट विनोद अग्रवाल, सेक्रेटरी योगेश मुंदडा, ट्रेझरर प्रसन्ना जैन, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. मिलिंद नवसारीकर, शेखर धनगर, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल, प्रशांत सिंघवी, पंकज मुंदडा, पंकज वाणी, अनिल रायसोनी, डॉ. संदेश गुजराथी, महेश पवार, हेमंत पवार, चेतन जैन, माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉ. रविंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. शिबीराला यू. के. मेडिकलचे मालक नीलेश महाजन यांचे सहकार्य लाभले. आगामी काळात क्लबतर्फे भव्य आरोग्य शिबीर घेणार असल्याचे सांगितले विनोद अग्रवाल यांनी सांगितले.