लुटीच्या गुन्ह्यात सहभागी महिलेस अटक

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ट्रक चालकांना मारहाण करून लुबाडणार्‍या टोळीतील महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, पारोळा येथे महामार्ग क्रमांक सहावर दोन ट्रक चालकांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाइलची चोरट्यांनी लूट केली होती. ४ मे रोजी मध्यरात्री ही लूट घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन स्थानिक संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केली असता या गुन्ह्यात एक महिला संशयिताचा ही समावेश असून ती फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. व तिचा शोध सुरू होता.

दरम्यान, संबंधीत संशयित महिला ज्योती गोपी पाटील ही तिच्या जावयाच्या घरी जात असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या महिलेला पोलिसांनी आडगाव येथे ताब्यात घेतले. या पथकात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक जाधव, महिला पोलिस कर्मचारी मोरे, पोलिस नाईक सुनील साळुंखे, संदीप सातपुते, कॉन्स्टेबल किशोर भोई, राहुल कोळी, हेमचंद्र साबे, राहुल पाटील यांनी यांचा समावेश होता.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: