पारोळा प्रतिनिधी। काल दादर रेल्वे स्टेशनवर खा.सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत टॅक्सी चालकाने गैरवर्तन केले. या टॅक्सीचालकावर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी पारोळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुख सुवर्णा पाटील, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अनिसा अरिफ पिंजारी, पारोळा तालुका समन्वयक अन्नपुर्ना, शहराध्यक्ष अमृता अमित मुदांणकर, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सोबतच महिला व किसान महाविद्यालयाच्या बहुसंख्य विद्यार्थीनीच्या हस्ते निषेधार्थ रॅली काढून तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
देशातील, महाराष्ट्रातील एक खासदार जर सुरक्षित नाही तर सामान्य महिलांचे काय? आआजपर्यंतचे सगळ्यात अपयशी आणि बेजबाबदार ठरलेल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फडणवीसांचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. निषेधार्थ रॅलीमध्ये विद्यार्थीनींनी कडून बोलले जात होते.