पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषद कर्मचयाऱ्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शपथ घेवून एरंडोल विधानसभा मतदार संघात ८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पारोळा नगर परिषदेच्या सभागृहामध्ये, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात मतदान शपथेने झाली. संपूर्ण पारोळा शहरात १९ नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निवडणूक गीत सादर करण्यात आले. १२ दिवस संपूर्ण शहरात विविध उपक्रमांद्वारे मतदार जनजागृतीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण शहरात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले पाहिजे, या संदर्भात विविध उपक्रम राबवून मतदार जनजागृती केली जाणार आहे, यामध्ये प्रामुख्याने पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, मतदार जनजागृती विषयी पोस्टर, चित्रकला व प्रश्नमंजुषा कार्यक्रम, संकल्प यात्रा, सायकल रॅली मॅरेथॉन स्पर्धांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ.उल्हास देवरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण, प्रशासन अधिकारी यामिनी जटे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी आरोग्य निरीक्षक दिलीप चौधरी, सुरेश अलोने, जितेंद्र चौधरी, किशोर चौधरी, सचिन चौधरी, विश्वास पाटील हे मतदान अधिकारी तर अक्षय सोनवणे तसेच मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक तरुण तरुणी बचत गटातील महिला आदी उपस्थित होते. १९ नोव्हेंबरला या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल असे आहेत.
१२ दिवस कार्यक्रम
९ नोव्हेंबर रांगोळी स्पर्धा, १० रोजी पथनाट्य सादरीकरण, ११ रोजी शाळा महाविद्यालयात मतदार जनजागृती विषयक पोस्टर चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धा, १२ रोजी मानवी साखळीद्वारे मतदार जनजागृती, १३ रोजी विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदान संदर्भात संकल्पपत्र, १४ रोजी मॅरेथॉन स्पर्धा, १४ रोजी कामगारांसाठी कार्यक्रम, १६ रोजी मोटरसायकल रॅलीतून जनजागृती, १७, १८ आणि १९ रोजी प्रशासनातर्फे घरोघरी भेटी देऊन जनजागृती केली जाणार आहे.