पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रति तिरुपती श्री बालाजी महाराज मंदिरात आज महाशिवरात्री चे औचित्य साधून अवघ्या वीस रुपयात पोटभर महाप्रसाद वितरण करण्याचा निर्णय श्री व्यंकटेश महाप्रसाद समितीने घेतला आहे.
शहरातील श्री बालाजी महाराज मंदिराला पावणे चारशे वर्षांचा इतिहास आहे. संस्थान व श्री व्यंकटेश महाप्रसाद समिती वतीने भाविकांसाठी यापूर्वी महाप्रसाद हा ३० रुपयाला दिला जात होता. तो आता महाशिवरात्रीचे औचित्य साधून २० रुपयात देण्याचा श्री व्यंकटेश महाप्रसाद समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या रोज वितरित होण्यार्या महाप्रसादवितरण जागेत देखील बदल करण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या दिवसापासून तो मंदिराने उभारलेल्या नवीन भक्तनिवासात दिला जात आहे. त्यास सुरुवात देखील झाली आहे.
महाप्रसाद समितीचे अध्यक्ष माजी खासदार ए टी पाटील यांच्या हस्ते आज भाविकांना उपवासाचा महाप्रसाद वाटप करून शुभारंभ हा करण्यात आला आहे. या महाप्रसाद समितीला अन्नदानाला भाविकांना वस्तू किंवा पैसे स्वरूपात देणगी द्यायचे असतील त्यांनी महाप्रसाद समितीचे सचिव व इतर पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी महा प्रसाद समितीला रवींद्र देवराम पाटील ग्रामसेवक रा धुळपिंप्री ता पारोळा, ५१००, सेवा निवृत्त मुख्यध्यापक देवराम लोटू पाटील रा. खाचणे ता. चोपडा.५१००, शैलेजा अरविंद निकुंभ रा. ठाणे ११०० अशी देणगी आज रोजी दिली आहे. या प्रसंगी मंदिराचे प्रमुख विश्वस्त श्रीकांत शिंपी, श्री व्यंकटेश महाप्रसाद समितीचे उपाध्यक्ष रमेश भागवत, डॉ. अनिल गुजराती, दिनेश गुजराती, किरण वाणी, दिलीप शिरोडकर, प्रकाश शिंपी, विश्वास चौधरी, केशव क्षत्रिय, गुणवंत पाटील, प्रवीण कोळी अमोल वाणी हे समिती सदस्य सह जितेंद्र चौधरी, चंद्रकांत शिंपी, भावडू राजपूत, धीरज महाजन,मनीष अग्रवाल, अरुण लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.