पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलिसासोबत हुज्जत घालणार्या तिघांच्या विरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा येथील चोरवड नाक्याजवळ भाजीपाला विक्रेत्याने रहदारीच्या मार्गावर आपले कॅरेट ठेवले होते. त्यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षाचे कर्मचारी दीपक अहिरे यांनी गस्तीदरम्यान भाजीपाला विक्रेता चंद्रकांत पाटील याला ते मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे पाटील याने पोलिसांशी हुज्जत घातली.
हा सर्व प्रकार २६ रोजी सकाळी घडला. या अनुषंगाने दीपक अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत पाटील याच्यासह अन्य तिघांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास प्रदीप पाटील करत आहेत.