पारोळा येथील खदानीत दोन बहिणींचा बुडून मृत्यू

पारोळा प्रतिनिधी । शहरातील धरणगाव रस्त्यावर असणार्‍या पोपट तलावाच्या खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघा भगिनींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यात आई व एका बहिणीचा जीव मात्र सुदैवाने वाचला आहे.

याबाबत वृत्त असे की, पारोळा-धरणगाव रस्त्यावर असणार्‍या पोपट तलावाच्या खदानीत परिसरातील बर्‍याचशा महिला धुणे धुण्यासाठी जात असतात. या अनुषंगाने आज दुपारी दोनच्या सुमारास सायराबाई शेख रशीद या आपल्या तीन मुली आशीयाबी, गुलनाजबी आणि रूखसार यांच्यासोबत धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, पावसामुळे पाण्याचा लोंढा आल्यामुळे गुलनाजबी पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी गेलेली रूखसार ही देखील पाण्यात वाहून गेली. तर सायराबाई आणि त्यांची मुलगी आशियाबी यांना परिसरातील लोकांनी धाव घेऊन वाचविले.

दरम्यान, दोन्ही मयत मुलींचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content