पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पारोळा बसस्थानक परिसराचा कॉंक्रीटीकरण कामासाठी मंजुर १.५० कोटी रूपयांचा विकासकामाचा भव्य भुमीपुजन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय अभियंता अक्षय महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पारोळा बसस्थानक झाल्यापासुन आजवर खड्ड्यांमुळे प्रवाशी, बसचालक, रिक्षाचालकांसह या ठिकाणी व्यवसाय करणार्या व्यापारी बांधव व शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती, तसेच या बसस्थानकावरून रहदारी वाहनांमुळे संपुर्ण धुळीचे साम्राज्य होत होते व पावसाळ्यात मोठा चिखल येथे साचत होता. त्यामुळे अनेक प्रवाशांचा तोल जाऊन त्यांना इजा होत होती, परंतु आता या कामाच्या भुमीपुजनामुळे हे काम पुर्ण होणार असुन या सर्वच समस्यांना आळा बसणार आहे. परिणामी, या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करणार्या छोट्या-मोठ्या व्यापारी बांधव व श्री बालाजी रिक्षा युनियन तर्फे आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.
यावेळी बाजार समिती मा.संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, पोपट चव्हाण, जि.प.मा.कृषि सभापती डा.दिनकर पाटील, मा.नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, जि.प.मा.सदस्य पांडुनाना पाटील, रोहीदास पाटील, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष अरूण पाटील, डा.राजेंद्र पाटील, शेतकी संघ उपाध्यक्ष नाना पाटील, मा.उपाध्यक्ष सखाराम पाटील यांचेसह बसस्थानक परिसरात व्यवसाय करणारे व्यापारी बांधव, श्री बालाजी रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी, संचालक, विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शिवसेना, युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, पत्रकार बांधव व शहरवासिय उपस्थित होते.
या भुमीपुजन सोहळ्याचे प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले, राकेश शिंदे, रामचंद्रआबा पाटील, दयारामआण्णा पाटील, भगवान जगनोर साहेब, चतुरभाऊसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर मुख्य मार्गदर्शन आमदार चिमणराव पाटील यांनी केले व सुत्रसंचलन नंदकुमार पाटील सर यांनी केले.
या मनोगतात ह्या मतदारसंघात नुसत आमदार म्हणुन मिरण्यासाठी नाही तर मतदारसंघाच पालकत्व करणे आहे, आज त्याच दुरदृष्टीने गेल्या स्वातंत्र्य काळापासुन प्रलंबित असलेल्या नागरिकांचा दैनंदिन आणि भविष्यातील गरजेचा विषयांना मार्गी लावण्याचे माग सुरू आहेत.
आज बसस्थानकाचा नुतनीकरणाचे मंजुरीचे काम जसे आपण मार्गी लावले त्याचप्रमाणे आज त्याच बसस्थानकाचा रंगरंगोटीचे काम देखील माझ्याच कार्यकाळात होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. यावेळी मतदारसंघात सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोट्यावधींचा विकासकामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला व तसेच सदरील काम हे उच्च प्रतीचे होण्यासाठी विशेष लक्ष देण्याचा सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकार्यांना दिल्या. तसेच पारोळासह एरंडोलचे देखील बसस्थानक कसे सुसज्ज, प्रवाशांसाठी सर्व सोयी-सुविधा युक्त करता येईल यासाठी पुढे प्रयत्न करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.



