पारोळा प्रतिनिधी । येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जोरदार जल्लोष करून फडणवीस यांच्या सरकार स्थापनेचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली वृत्त येताच येथील भाजपातर्फे जोरदार जयघोष करण्यात आला. पारोळा शहर अगोदरपासून जनसंघाच्या बालेकिल्ला समजले जाते. या शहरात आज पर्यंत जास्तीत जास्त जनसंघ,नांगरधारी शेतकरी, त्याचप्रमाणे भाजपचे कमळ निशाणी असलेले उमेदवार निवडून येत होते. काल पर्यंत राजकारणाच्या अचानक बदलामुळे येथील संघ कार्यकर्ते त्याप्रमाणें भाजपचे कार्यकर्ते बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी एकत्र जमून ढोल,तश्याच्या गजरात बालाजी मंदिरात जाऊन श्री बालाजी चे दर्शन घेतले. यानंतर भारतीय जनता पार्टीचा विजय असो,भारत माता की जय अशा जोरदार घोषणा करण्यात आल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, सूरेंद्र मराठे, भाजपचे शहर प्रमुख मुकुंदा भाजपाचे नगरसेवक भैय्या चौधरी, धीरज महाजन, तालुकाध्यक्ष भाजपाचे रवींद्र पाटील, नवनीत लोहार, विजय पाटील, समीर वैद्य, माजी नगरसेवक सुदाम चौधरी, मनोहर चौधरी, वामन पांडू चौधरी, मुकुंद बोहरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.