पिशवी लांबविण्याचा प्रयत्न : दोन महिलांना पोलीस कोठडी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पिशवीला ब्लेडने कापून २१ हजार रुपये लांबवण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन महिलांना अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की,शहरातील सेंट्रल बँकेसमोरील फळविक्रेत्याच्या स्टॉलसमोर धर्मराज लोटन पाटील (वय ६८,रा.पारोळा) हे उभे होते. याप्रसंगी त्यांच्याकडे पिशवीत २१ हजा रूपयांची रोकड होती. दरम्यान, या पिशवीला ब्लेडने कापून थैलीतील रोकड लांबवण्याचा प्रयत्न अंजली सिसोदिया (वय २०) व रचना सिसोदिया (वय ३०, रा.कठीया, जि.राजगड, मध्य प्रदेश) या दोन महिलांनी केला. मात्र हा प्रकार लक्षात आल्याने या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी अंजली सिसोदिया (वय २०) व रचना सिसोदिया (वय ३०, रा.कठीया, जि.राजगड, मध्य प्रदेश) यांच्या विरूध्द पारोळा पोलीस स्थानकात कलम ३७९, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही संशयित महिलांना पारोळा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content