यावल प्रतिनिधी । पाऊस पडण्यासाठी येथील महर्षी व्यास मंदिरात पर्जन्य याग सुरू झाला असून यात नागरिक सहभागी झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, गत अनेक वर्षांपासून यावल तालुक्यात व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत अत्यल्प पावसाळा होत आहे. या अनुषंगाने येथील महर्षी व्यास मंदिरात पर्जन्ययाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे . यानिमित्त शहरातून जलयात्रा काढण्यात आली. तर मंगळवारी २१ ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात सहा जोडप्यांच्या हस्ते पंचांग कर्मण, स्थापीत देवता पुजनास सुरवात करण्यात करण्यात आली आहे. हा यज्ञयाग २० जुनपर्यंत आयोजीत करण्यात आला आहे.
या धार्मीक विधीमध्ये विनोद बयानी, यु. एम. यावलकर, नामदेव बारी, राजेंद्र नेहेते, चेतन माळी व महेंद्र येवले या यजमांनानी सहभाग घेतला. तर नारायण बयानी, अतुल बाविसे, शाम नाईक, राजेश बयानी, इंद्रजीत जोशी, महेश बयानी, उमेश सराफ, भुषण कुळकर्णी समस्त पुरोहीत मंडळ यावल यांच्या मंत्रोचारात यज्ञयाग होत आहे.