Home Cities जळगाव परिवर्तन जळगावात ‘आखाजी पहाट’चा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

परिवर्तन जळगावात ‘आखाजी पहाट’चा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खानदेशातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या आखाजीच्या आगमनाची अनोख्या पद्धतीने सुरुवात करण्यासाठी परिवर्तन जळगावतर्फे ‘आखाजी पहाट’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता भाऊंचे उद्यान येथे या विशेष मैफिलीचे आयोजन केले आहे. खानदेशातील कृषी संस्कृती आणि लोकपरंपरांशी घट्ट नाळ जोडलेला हा सण हजारो वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

परिवर्तन जळगाव नेहमीच खानदेशातील संस्कृती, साहित्य आणि लोककला महाराष्ट्राच्या समोर आणण्यासाठी विविध प्रयत्न करत असते. याच भूमिकेतून संस्थेने यावर्षी ‘आखाजी पहाट’ या नवीन कार्यक्रमाची संकल्पना साकारली आहे. अक्षय तृतीयेचे महत्त्व जरी वेगळे असले तरी, खानदेशात आखाजी आजही एक मोठा सण मानला जातो. त्यामुळे या सणाचा आनंद पहाटेपासूनच संगीतमय वातावरणात घेण्यासाठी परिवर्तनने ३० एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता भाऊंचे उद्यान येथे या विशेष मैफिलीचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सुनील बारी यांची असून, मंजुषा भिडे आणि नारायण बाविस्कर यांनी दिग्दर्शन केले आहे. निर्मिती प्रमुख म्हणून मोना निंबाळकर आणि अक्षय नेहे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यक्रमात हर्षल पाटील, शरद भालेराव, अंजली धुमाळ, रजनी पवार, मुकेश खैरे, रोहित बोरसे, यश महाजन, अंजली पाटील, नेहा पवार आणि तेजस मराठे हे कलाकार आपल्या सुमधुर गायनाने पहाटेच्या वातावरणाला एक खास रंगत देणार आहेत. आयोजित केलेला कार्यक्रम हा सर्वांसाठी खुला असून याचा जळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

‘आखाजी पहाट’ हा कार्यक्रम खानदेशातील संस्कृती आणि परंपरेचा अनुभव जळगावकरांना देईल, यात शंका नाही. परिवर्तनच्या या नवीन उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound