भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ परदेशी-परीट बहुउद्देशीय संस्थेत महाराष्ट्र राज्य परदेशी धोबी समाजाचे 13 वे राज्यस्तरीय दोनदिवसीय अधिवेशन, उद्या शनिवार 27 ते 28 जुलै 2019 दरम्यान येथील मातृभूमी चौकातील संतोषीमाता सभागृहात सकाळी 10 वाजेपासून सुरूवात होणार आहे.
कार्यक्रमास यांची राहणार उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू कोठारी आदी मान्यरांची उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनात धोबी समाजाच्या आरक्षणाबाबत मार्गदर्शन महाराष्ट्र धोबी परिट समाज महासंघ स्वभाषिकचे संस्थापक अध्यक्ष देवराम सोनटक्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा
27 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन, 11 ते 1 वाजेदरम्यान प्रांतिक अहवाल तथा सामाजिक चर्चा, द्वितीय सत्रात दुपारी 2.30 ते 3.30 वाजेदरम्यान नवीन प्रांतिक कमिटीची निवड, दुपारी 3.30 ते 4 वाजेदरम्यान प्रांतिक कार्यकारिणी तयार करणे, सायंकाळी 5 ते 7.30 वाजेदरम्यान नवीन प्रस्ताव तथा सूचना आणि सभासदद्वारा मत प्रकट करणे आदी कार्यक्रम होतील. दि. 28 रोजी तृतीय सत्रात सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान नवीन प्रांतिक कमिटीद्वारा सामाजिक गतिविधी यावर मत प्रकट तथा नवीन नियमांना मंजूरी, दुपारी 2 ते 2.30 वाजेदरम्यान समारोप कार्यक्रम होईल. अधिवेशनात समाजबांधवांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन भुसावळ परदेशी धोबी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.