पारोळा प्रतिनिधी । शहरात रविवारच्या दिवशी मोठाप्रमाणात बाजार भरलेला असतो. याठिकाणी मोठी वर्दळदेखील असते. याचा फायदा 3 चोरांनी घेत वेगवेगळया मार्गाने 5 ते 6 मोबाईल चोरी केल्याचा प्रकार उघडीस आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तिघं चोरट् वेगवेगळया दिशेने मोबाईल चोरी करत असल्यास संशय गावातील छोटू पाटील यांना आल्याने त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशनला संपर्क केला. पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतले असून आरोपीकडून 5 ते 6 मोबाईल व गुंगीचे औषध असलेले पॉकेट जप्त करण्यात आले आहे. आरोपी शेख साजिद शेख शब्बीर (वय-32) रा.गुलशन नगर उमर युसुफ मशिदीजवळ मालेगाव, मोहम्मद हरून अब्दुल मन्नास (वय-35) रा. मुन्शी साबान नगर खैरुल इस्माल मशिंदजवळ मालेगाव आणि मुक्तार शेख वजीर(वय-62) रा. गौस पु.रा. गरीब नवाज मशीद सोनगाव फाटा मालेगावचे रहिवासी आहेत. यांच्यातील एक जण बाजारपेठेत, तर दोन जण बस स्टैंडवर रहिवाशांच्या मदतीने पोलिसांना सापडले आहेत. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज राठोड करीत आहेत.