धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शहर अध्यक्ष विलास भाऊ महाजन यांनी १५ जानेवारी रोजी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी गोशाळेमधील जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप केले, तसेच धरणगाव येथील मूकबधिर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली.
सामाजिक कार्याची बांधिलकी जपत महाजन यांनी आपला वाढदिवस समाजासाठी समर्पित केला. “समाजासाठी काहीतरी देणे हीच खरी सेवा आहे,” असे महाजन यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमास गटनेते पप्पू भाऊ भावे, संजय महाजन, कैलास माळी सर, संजय चौधरी, वासुदेव चौधरी, भानुदास विसावे, पुनीलाल महाजन, शिरीष बयस, दिलीप महाजन, वाल्मीक पाटील, कन्हैया रायपूरकर, मच्छिंद्र पाटील, बाळू जाधव, चंदन पाटील, जितेश राजेंद्र महाजन, मोनू महाजन, मयूर मोरारकर, कैलास महाजन व भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महाजन यांच्या या उपक्रमामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या या आगळ्या वाढदिवस साजऱ्यामुळे समाजसेवेचा नवा आदर्श उभा राहिला आहे.