जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या पेपर तपासणीत मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा समोर आला आहे. नोव्हेंबर २०१८ च्या पुनर्मुल्यांकन (रिचेकिंग) परीक्षेचा निकाल दिनांक २५ व २७ फेब्रुवारी तसेच दिनांक ०५,१३,१५ मार्च, व १० एप्रिल २०१९ रोजी विद्यापीठाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मध्ये विविध विषयात 50 टक्के पर्यंत विद्यार्थ्यांच्या निकालात बदल होऊन विद्यार्थी पास झाले आहेत.
ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पुनर्मुल्यांकन निकालात झालेल्या बदलामुळे पेपर तपासणी कशा प्रकारे होत असेल असा प्रश्न निर्माण होत आहेत. या नुसार शून्य गुण प्राप्त असणाऱ्या बैठक क्र.३५१०६५ -४० गुण, बैठक क्र.३३१२७२ – ५१ गुण व बैठक क्र.३४७९३४ -१८ गुण चे ४० आशा प्रकारे गुणांन मध्ये बदल झालेला आहे. या पूर्वी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकन तपासणीत झालेल्या गुण वाढी संदर्भात निवेदन देण्यात आले होते. परंतू विद्यापीठाणे कोणत्याही प्रकारची पेपर तपासणीत खबरदारी घेतली नसल्याचे यातून दिसून येते व यामुळे पुनर्मुल्यांकन (रिचेकिंग) तपासणी, फोटोकॉपी या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे.
या संदर्भात विद्यार्थी परिषदेच्या वतीने १८ मार्च रोजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटू पाटील यांना निवेदन दिले व पेपर तपासणीत निष्काळजी करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्यामुळे अभाविपचे शिष्टमंडळाने कुलगुरू सरांना भेटून या संदर्भात चर्चा केली व निवेदन दिले व याची योग्य ती चौकशी करून पेपर तपासणीमध्ये निष्काळजी करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करावी, पुनर्मुल्यांकनमध्ये गुण वाढणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० टक्के पुनर्मुल्यांकन शुल्क कोणत्याही प्रकारचे अर्ज न करता परत मिळावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकन निकाल वेळेत न लागल्या कारणास्तव त्याच पेपरसाठी सेमिस्टर फॉर्म भरलेला अशा विद्यार्थ्यांना सेमिस्टर शुल्क परत करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल व कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. या संदर्भात पेपर तपासणीत हलगर्जीपणा करणाऱ्या प्राध्यापकांवर सात दिवसात कारवाई केली नाही तर अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा ईशारा विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.