जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे सरकार सत्तारुढ होण्यासाठी पँथर रिपब्लिकन पाटीर्चे पक्षाध्यक्ष व माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यापुढेही काँग्रेस महाघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवार यांचे काम करणार असल्याची माहिती पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा युवा नेते आकाश बिऱ्हाडे यांनी सांगितले.
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा काँग्रेस महाआघाडीला पाठींबा
6 years ago
No Comments