मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | विधानपरिषदेसाठी यावेळी पंकजा मुंढे यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता होती, परंतु त्यांना डावलण्यात आले. खडसेंच्या बाबतीतही हेच झाले असल्याचे राष्ट्रवादीचे मंत्री ना. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
भाजपाकडून राज्यसभा निवडणूकीत जास्त उमेदवार दिले असून गेल्या काही दिवसापूर्वीच पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्यास दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांना उमेदवारी मिळेल असे वाटत होते. परंतु आज विधानपरिषदेसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. यात प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना वगळण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी घेतले जाईल असे वाटले होतं. परंतु तसे काही झाले नाही. खडसेंच्या बाबतीतही हेच झाले असून याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असल्याचे म्हटले आहे.