Home Cities चोपडा पंकज बोरोलेंची राजकारणात ‘एंट्री’ : शिवसेनेतून सुरू करणार राजकीय ‘इनिंग’ !

पंकज बोरोलेंची राजकारणात ‘एंट्री’ : शिवसेनेतून सुरू करणार राजकीय ‘इनिंग’ !

0
433

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंकज उद्योग समूहाचे अध्यक्ष पंकज सुरेश बोरोले यांनी राजकारणात प्रवेश केला असून ते शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आपली राजकीय कारकिर्द सुरू करणार आहेत.

चोपडा येथे रविवारी झालेल्या सोहळ्यात शिवसेनेत इनकमिंग झाले. चोपडा येथील बोथरा मंगल कार्यालय येथे वडणूकीच्या निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यात शहरातील पंकज सुरेश बोरोले(अध्यक्ष, पंकज समुह),सुरेश मगन बडगुजर (माजी नगरसेवक), दिपक भगवंतराव पाटील (अध्यक्ष,चोपडा मेडीकल असो.) बापू प्रभाकर माळी (संचालक बापु डेअरी), पियुष राजेंद्र चौधरी (उद्योजक मुंबई), मल्हारपुरा येथील कै भिमराव भाऊराव पाटील यांचे नातू व शेखर भिमराव पाटील यांचे चिरंजीव जय शेखर पाटील व प्रितम शेखर पाटील तसेच अडावद येथील शे तहिर शे रज्जाक (उप सभापती पंचायत समिती),काझी याकूब अली (मा. विकास सोसा चैरमन),बानो बी शेख रसीद मन्यार (ग्रा. पंचायत सदस्य),कमलाबाई राजु खजुरे (ग्रा.पंचायत सदस्य),रेखाबाई मंगेशराव पारधी (ग्रा. पंचायत सदस्य),शाहरूख हैदर तड़वी (ग्रा. पंचायत सदस्य),मोहसीन अलीयार तडवी (ग्रा. पंचायत सदस्य) यांनी प्रवेश केला.

आजच्या प्रवेश सोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे पंकज उद्योग समूहाचे अध्यक्ष पंकज सुरेश बोरोले यांचा राजकारणातील प्रवेश होय. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू असली तरी या प्रवेशामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचे वडील तथा तापी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनी देखील काही काळ राजकारणात वाटचाल केली असली तरी ते फार पुढे गेले नव्हते. यामुळे आता पंकज बोरोले यांच्या राजकीय कारकिर्दीत ते कोणते शिखर सर करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound