Home Cities धरणगाव धरणगावात पंडित जवाहरलाल नेहरु जयंती उत्साहात

धरणगावात पंडित जवाहरलाल नेहरु जयंती उत्साहात

0
34

dharangaon 1

 

धरणगाव प्रतिनिधी । येथील धरणी चौकात काँग्रेस पक्षातर्फे आणि बी.जे. महाजन माध्यमिक विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

धरणगावात आज पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली आहे. धरणी चौकात काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते मा.प्रभाकर नेरपगार यांचा हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळेस कॉंग्रेसचे सलीम शेख, हंसराज पुरभे, नंदलाल महाजन, रामचंद्र माळी, रवि महाजन, राजेंद्र वानखेडे, गौरव चव्हाण, भूषण भागवत, कल्पेश महाजन, योगेश येवले, राजेंद्र ठाकुर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

तसेच बी.जे. महाजन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी यांनी फोटो प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी बी.आर.महाजन, आर.बी.महाले, के.ए.वारुळे, किरण महाजन, बी.डी.सुतार, पी.एन.माळी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound