पाचोरा येथे पंचायत राज समिती आढावा बैठक उत्साहात (व्हिडिओ)

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील पंचायत राज समितीची आढावा बैठक भडगाव रोडवरील अल्पबचत भवनात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती.

समितीच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर येथील आमदार किशोर जोरगेवार तर सदस्य म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे (पाळसप), आमदार सदाभाऊ खोत (वळवा), रा. स. प. चे आमदार रत्नाकर गुट्टे (गंगाखेड), अधिकारी वर्गामध्ये विधीमंडळ समिती सहाय्यक रणजीत गामरे, जळगांव जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी विनोद गायकवाड, प्रतिवेदक ज्ञानेश्वर तेलंग यांनी पाचोरा पंचायत समितीचे विविध विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभागांचा झालेल्या कामांचा आढावा घेतला.

यावेळी नगरदेवळा ता. पाचोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामास अनेक दिवसांपासून निधी उपलब्ध असतांना बांधकाम का झाले नाही ? या विषयावर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी गटविकास अधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, बांधकाम अभियंता एस. एस. बोरसे यांचेवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी अभियंता बोरसे यांनी कामास अंतिम मंजुरी मिळाली असुन बांधकामाच्या जागेवर मोठ – मोठी वृक्ष असल्याने ते तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी वन विभागाकडे प्रस्ताव सादर केलेला असल्याचे सांगितले.

गट शिक्षण अधिकारी विकास पाटील यांना शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शालेय व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षण, शालेय पोषण आहारामध्ये पुरक आहार, शाळेतील भौतिक सुविधा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत वर्गवार मुलांचा शैक्षणिक स्तर याविषयी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे, सुनिल पाटील, राजकुमार धस यांनी घरकुल योजना, खाजगी व सार्वजनिक शौचालये, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, रोजगार हमीतील विहीरी, गोठाशेड याबाबत सविस्तर माहिती सांगितली. आढावा बैठकीत आरोग्य विभागा विषयी माहिती जाणून घेवुन लसीकरणाचा आढावा घेण्यात आला.

सतत पाऊस सुरू असल्याने समितीच्या सदस्यांनी आढावा बैठक आटोपती घेतली. यावेळी पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड, चाळीसगाव पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते रावसाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसींग पाटील, मधुकर काटे, माजी सभापती सुभाष पाटील, महिला बाल प्रकल्प अधिकारी पदम परदेशी, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, जि. प. बांधकाम अभियंता चंद्रकांत वाडिले, जि. प. लघु सिंचन विभागाचे अभियंता सुनिल पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, लोहारा येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, किरणकांत जोगी सह तात्कालिक गट विकास अधिकारी, बांधकाम अभियंता, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/670938204309584

 

Protected Content