नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर करतांना पॅनकार्डबाबत महत्वाची घोषणा केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल. त्यासोबतच युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पॅनकार्डबाबत महत्वाची घोषणा केली असून यामुळे आता विविध बाबींशी याला लिंकींग करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.