पालघर । मागील काही दिवसांपासून भूकंपाचे लहान धक्के सहन करणार्या पालघमध्ये आज सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास सौम्य धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंद करण्यात आली. या धक्क्याची तीव्रता आजपर्यंत झालेल्या भूकंपाच्या धक्क्यापेक्षा मोठी आहे. आज झालेला भूकंपाचा धक्का हा पालघर जिल्ह्यातील वडराईपर्यंत जाणवला.
बोईसर औद्योगिक वसाहती बरोबरच अणू ऊर्जा प्रकल्पात देखील जाणवले. त्याशिवाय गुजरात सीमेवरील उंबरगावपर्यंत धक्याची तीव्रता जाणवली. या भूकंपामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. भूकंपामुळे रेल्वे रुळांना तडे गेले आहेत किंवा काय याची तपासणी करण्यात येत आहे.