पालघर वृत्तसंस्था । राज्यात आज (दि.8 जानेवारी) सहा जिल्हा परिषदेचा निकाल समोर आला आहे. यामध्ये पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने विजय मिळवला असून सहा जागांपैंकी पाच ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
पालघरमध्ये आज जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली. या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तसेच ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी झाली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 57 पैकी शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 10, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6, बहुजन विकास आघाडी 4, अपक्ष 3 तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानवे लागले आहे.
57 जागांपैकी बहुमतासाठी 29 जागांची गरज असली तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. गेल्यावेळेस शिवसेना-भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी अशा तिघांकडे पालघर जिल्हा परिषदेची सत्ता होती. पण यावेळी राज्यातील सत्ता बदलामुळे पालघर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपला मागे टाकण्यात शिवसेना राष्ट्रवादीला यश आल्याचे पहायला मिळत आहे.